DreamPirates > Lyrics > Kevdyach pan tu song Lyrics

Kevdyach pan tu song Lyrics

Author: DreamPirates | Last Updated : 2023-02-13 00:00:00

Kevdyach pan tu song Lyrics

Film/Album :
Language : NA
Lyrics by : Guru Thakur
Singer : Ajay Gogavale, Aarya Ambekar
Composer : Vijay Gavande
Publish Date : 2023-02-13 00:00:00

Kevdyach pan tu song  Lyrics


Song Lyrics :

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

सागराची गाज तू गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याच॔ सपान तू

तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
माझ्या ओंजळीत सुख माइना

तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना

मेघुटाची हूल तू चांदव्याची भूल तू
भागंना कदी अशी तहान तू

केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली

तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला सोनपावली

जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं दान तू
केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

Tag : lyrics

Watch Youtube Video

Kevdyach pan tu song  Lyrics

Relative Posts